esakal | Schools Reopen : कोरोना नियमांचं पालन, काही राज्यातील शाळेत पुन्हा 'घंटानाद'
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना नियमांचं पालन, काही राज्यातील शाळेत पुन्हा 'घंटानाद'

कोरोना नियमांचं पालन, काही राज्यातील शाळेत पुन्हा 'घंटानाद'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Schools Reopen : कोरोनाची दुसरी लाट थंडावल्यानंतर अनेक राज्यात आजपासून शाळा सुरु करण्यात येत आहे. कोरोना नियमांचं पालन करत अनेक राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दीड वर्षानंतर आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझरसह विद्यार्थी बुधवारी सकाळी शाळेत जाताना दिसले. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. कोरोनाच्या काळात शाळेपासून महाविद्यालयापर्यंत दरवाजे बंद होतं. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु होतं. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे काही राज्यांनी पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. तर काही राज्यांनी वेट अँड वॉच निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी खास योजना; लाखोंच्या हमीसाठी अशी करा नोंदणी

उत्तर प्रदेशमध्ये काय स्थिती?

उत्तर प्रदेशमध्ये आजपासून पहिली ते पाचवीपर्यंतचे सर्व वर्ग सुरु करण्यात आले आहेत. कानपूरमधील यशोदा नगरमधील सरस्वती शिशु विद्या मंदिराच्या मुख्याधिपिकांनी सांगितले की, 'सर्व कोरोना नियमांचं पालन करत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसवलं आहे.'

राजधानीमध्येही शाळा सुरु-

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही आजपासून शाळा सुरु करण्यात आली आहे. नववी ते 12 वी पर्यंत असणाऱ्या शाळा आणि कॉलेज सुरु करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. शिवाय ट्युशनही घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीमधील हारकोर्ट बटलर स्कूलमध्ये फक्त पाच विद्यार्थी पोहचले. त्यानंतर शिक्षकांनी ऑनलाइन क्लास घेण्यास पसंती दर्शवली. दिल्लीमध्ये विद्यार्थ्याला शाळेत येण्यासाठी सक्ती करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: गरज असेल तिथेच आघाडी, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

राजस्थानमध्येही वाजली शाळेची घंटा -

सहा महिन्यानंतर राज्यस्थानमध्ये पुन्हा एकदा शाळा उघडल्या आहेत. सकाळी साडेसात वाजता नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत पोहचले. सकाळी दोन टप्प्यात शाळा सुरु राहणार आहेत. नववी आणि अकरावीचे विद्यार्थी एका टप्प्यात आणि दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात शाळेत जाणार आहेत. राज्यस्थान सरकारच्या नियमांनुसार 60 टक्के विद्यार्थ्यी हजर असावेत. तर 40 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेतील. मागील तीन महिन्यापासून शाळा बंद होत्या, त्यामुळे राज्यस्थान सरकारने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी खास योजना; लाखोंच्या हमीसाठी अशी करा नोंदणी

मध्यप्रदेश/कर्नाटक -

मध्य प्रदेशमध्ये सहावी ते 12 पर्यंतचे विद्यार्थी आज शाळेत पोहचले. यावेळी कोरोना नियमांचं पालन केल्याचं दिसत होतं. याशिवाय कर्नाटकमध्येही शाळाची घंटा वाजली आहे.

loading image
go to top