चमचा राज्यपालाकडे महत्त्वाचा निर्णय का? -  शोभा डे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लेखिका शोभा डे नव्या ट्विटमुळे पुन्हा प्रकाशात आल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेला महत्त्व आले. यावर भाष्य करताना शोभा डे यांनी 'लोकशाहीत इतका महत्त्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का,'' असा सवाल उपस्थित केला आहे. यावर

या ट्‌विटमुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. मात्र, यावर न थांबता शोभा डे यांनी दुसऱ्या ट्‌विटमध्ये 'कर्नाटकात किती घोडे खरेदी केले आणि विकले,'' असा खोचक सवाल करत कृपया, 'मला त्यांचे फोन नंबर आणि नावे सांगा,'' अशी विनंतीही केली. त्यांच्या या ट्‌विटचीही खिल्ली यूजर्सने उडवली आहे. "शोभा डे यांनी राजकारणावर भाष्य करू नये. त्यांनी पेज थ्री आणि बॉलिवूडवरच भाष्य करावे. आपण ज्या विषयात सर्वोत्तम आहोत तिथेच बोलावे,' असा सल्ला त्यांना दिला आहे.

Web Title: governor shobha day