अजित पवारांकडून मागासवर्गीयांची फसवणूक-गुणरत्न सदावर्ते

बढती आरक्षणाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची वकिलांची मागणी
Ajit Pawar
Ajit PawarSAKAL
Summary

सरकारी नोकऱ्यांच्या बढत्यांमधील आरक्षणासंदर्भात (Government Job Promotion) उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar)आणि उर्जामंत्री नितीन राऊत हे मागासवर्गीयांची फसवणूक (Cheats OBC Reservation)करीत असल्याने याबाबत राज्यपालांनीच (Governer)हस्तक्षेप करावा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

मुंबई : सरकारी नोकऱ्यांच्या बढत्यांमधील आरक्षणासंदर्भात (Government Job Promotion) उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar)आणि उर्जामंत्री नितीन राऊत हे मागासवर्गीयांची फसवणूक (Cheats OBC Reservation)करीत असल्याने याबाबत राज्यपालांनीच (Governer)हस्तक्षेप करावा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ( Governor should interfere in government jobs promotion reservation of obc demand by lawyer)

Ajit Pawar
शिक्षकांना ठाकरे सरकारने फसवलं ?

या प्रश्नावर आज त्यांनी आणि वकील जयश्री पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व त्यांना लेखी निवेदन देखील दिले. हे दोघेही नेते परस्परविरोधी विधाने करीत आहेत व न्यायालयात भलतीच भूमिका घेत आहेत.असेही या दांपत्याने राज्यपालांना दाखवून दिले आहे. त्यामुळे या दोघा नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एकीकडे आम्ही बढत्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देऊ, असे हे दोघे नेते जाहीरपणे सांगत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने उच्च न्यायालयात आणि राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) प्रतिज्ञापत्र सादर करून बढत्यांमध्ये आरक्षण देणे शक्य नाही असे सांगितले आहे. याचा अर्थ हे दोघे नेते मागासवर्गीयांची फसवणूक करीत आहेत व त्यांची वक्तव्ये राज्यघटनेविरोधी आहेत. असत्य विधाने करणे हे मंत्रीपदाच्या शपथेविरुद्ध आहे, असा दावाही सदावर्ते यांनी केला आहे. याप्रकरणी आता राज्यपालांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com