esakal | राज्यपालांच्या हस्ते ‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या बोधचिन्हाचे अनावरण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राज्यपालांच्या हस्ते ‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या बोधचिन्हाचे अनावरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पत्रकारांच्या (journalists) व्यापक हितासाठी काम करताना पत्रकार (journalists) संघटनांनी उच्च ध्येय समोर ठेवून मिशनरी स्पिरीटने (missionary spirit) काम करावे. पत्रकारांच्या समस्या शासनाकडे (Goverment) नेताना त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरण केल्यास त्यांची दखल घेणे भाग पडेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘व्हाईस ऑफ मिडिया’ (Voice of Media) या राष्ट्रव्यापी संघटनेच्या बोधचिन्हाचे (LOGO) अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे बुधवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

करोना काळात राज्यात अनेक पत्रकारांचे निधन झाले. मात्र नेमक्या किती पत्रकारांचा करोनामुळे मृत्यू झाला याबाबत अचूक माहिती एकत्रितपणे कोठेही उपलब्ध नाही हे खेदजनक आहे असे नमूद करून पत्रकार संघटनांनी पत्रकारांविषयी सर्व माहितीची योग्य नोंद घेऊन मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. पत्रकारीतेत तंत्रज्ञानामुळे बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांनी पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य वर्धनासाठी काम करावे अशीही सूचना कोश्यारी यांनी यावेळी केली.

‘व्हाईस ऑफ मिडिया’ चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार संघटना पत्रकारांचे आरोग्य, निवृत्त पत्रकारांना मदत, पत्रकारांचे प्रशिक्षण यांसाठी काम करणार असून आजवर १८ राज्यात संघटनेचे काम सुरु झाले असल्याचे सांगितले. नवा काळच्या संपादिका जयश्री खाडिलकर, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सीईओ चंद्रमोहन पुप्पाला, साम टीव्हीचे संपादक प्रसना जोशी, संपादक आशुतोष पाटील, जय महाराष्ट्रचे सीईओ चंद्रमोहन पुप्पाला, सोराचे संपादक नरेंद्र बोर्लेपवार, संपादक तुळशीदास भोईटे, प्रजवाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, संपादक संतोष आंधळे राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते.

व्हाईस ऑफ मीडिया'ची राष्ट्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे  :

संस्थापक, अध्यक्ष संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, उपाध्यक्ष मंदार फणसे, उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र बोरलेपवार, सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, सहसरचिटणीस राहुल पांडे, कोषाध्यक्ष चिंतन थोरात, कार्यवाहक शंतनू डोईफोडे, संघटक सुधीर लंके, संघटक परवेज खान, संघटक आश्विनी डोके, संघटक जयशील मिजगर.

हेही वाचा: काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पाहा व्हिडिओ.

पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी उभारला जाणार लढा - संदीप काळे"

गेल्या तीन वर्षांपासून देशभरामध्ये पत्रकारिता आणि पत्रकारांची टीम, पत्रकारांच्या प्रश्नांवर 'व्हाईस ऑफ मीडिया' अंतर्गत रिसर्च करीत आहे. या रिसर्चच्या माध्यमातुन दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे आल्यात. एक म्हणजे, पत्रकारितेला व्यवहार बनवून, वैयक्तिक साधन बनवून तिचा सर्रासपणे वापर करणे आणि पत्रकारितेची मुल्य पायदळी तुडविने सुरू आहे. दुसरे, जो पत्रकार पत्रकारितेचा कणा, चौथा स्तंभ, पत्रकारितेला, लोकशाहीला मजबूत ठेवण्याचे काम करतो, त्याला सरकार, धोरण, मालकशाही आणि स्वतः पत्रकार सुद्धा जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. नेमके दोष शोधून, त्यावर पर्यायी उपाय शोधणे आणि सकारात्मक पत्रकारितेच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घेणे. हेच, 'व्हाईस ऑफ मीडिया' या पत्रकार संघटनेचे, पत्रकार ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. असे, 'व्हाईस ऑफ मीडिया' चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: आंबेगाव खुर्दमधील पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध "मोका" अंतर्गत कारवाई

व्हॉईस ऑफ मिडिया’ च्या लोगोचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संपादक संदीप काळे, सरचिटणीस जय महाराष्ट्रचे सीईओ चंद्रमोहन पुप्पाला, नवाकाळ संपादक जयश्री खाडिलकर, साम टीव्हीचे संपादक प्रसना जोशी, नेटवर्क 18 चे संपादक आशुतोष पाटील, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, संपादक तुळशीदास भोईटे, सोराचे संपादक नरेंद्र बोरलेपवार, संपादक संतोष आंधळे, संपादक चिंतन थोरात, संपादक जयशील मिजगर हे उपस्थित होते

loading image
go to top