esakal | महाराष्ट्र सरकार २५ हजार टन O2 आयात करणार?

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant
महाराष्ट्र सरकार २५ हजार टन O2 आयात करणार?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर अभावी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने २५ हजार टन ऑक्सिजन आणि १० लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन आयात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे ऑक्सिजन आणि औषधे तयार ठेवण्याची आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची योजना आहे.

त्याशिवाय राज्याला ऑक्सिजन टँकर्स आणि कॉनसनट्रेटर्स आयात करायचे आहेत. महाविकास आघाडीचे सरकार केंद्र सरकारकडून मदतीला विलंब होत असल्याचा आरोप करतेय. २५ हजार टन ऑक्सिजन, १० लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन टँकर्स, आणि ऑक्सिजन कॉनसनट्रेटर्स आयात करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवला आहे. सोमवारी उच्चस्तरीय समिती यावर निर्णय घेईल अशी सूत्रांची माहिती आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

सध्या १,७५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होतोय. त्यामुळे तुटवडा नसल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. महाराष्ट्राची १,२५० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. केंद्र सरकारने केलेल्या वाटपातून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळतोय. सध्या आम्ही पूर्ण स्टॉक वापरतोय. सध्यातरी राज्यात ऑक्सिजनची कमतरता नाहीय.