esakal | MLC Election Results 2020: 'मविआ'ची ताकद ओळखण्यास कमी पडलो- फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

MLC Election Results 2020: 'मविआ'ची ताकद ओळखण्यास कमी पडलो- फडणवीस

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांच्या निकालावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

MLC Election Results 2020: 'मविआ'ची ताकद ओळखण्यास कमी पडलो- फडणवीस

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या.  भाजपचा केवळ धुळे-नंदुरबारची एकमेव जागेवर विजय झाला आहे.  नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला. यात भाजपनं औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे तर भाजपचा बालेकिल्ला नागपूर पदवीधर मतदारसंघही गमावला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या निकालावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई विभागातल्या अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. तर शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं, असा टोलाही फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 

विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असून आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती. मात्र एकच जागा मिळाली आहे. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. आमच्या स्ट्रॅटेजीत काही चूक झाली असेल. याव्यतिरिक्त तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

अधिक वाचा-  जेव्हा सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांना म्हणतात, 'थँक्यू'

या निवडणुकीत भाजपचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नसून या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आहे. एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Graduate constituency election result 2020 Leader Opposition Devendra Fadnavis reaction

loading image