'पदवीधर'च्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेतील नाशिक व अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाने चार जानेवारी 2017 रोजी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण विभागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झालेली आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
Web Title: Graduates apply the Code of Conduct for elections