Gram Panchayat Results : शिवसेनेवर आणि चंद्रकांत पाटील यांच्या पराभवावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया

Gram Panchayat Results : शिवसेनेवर आणि चंद्रकांत पाटील यांच्या पराभवावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज समोर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर भाष्य केलंय. ज्यांच्या पॅनल्सचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा होता ते चांगल्या पद्धतीने जिंकतायत. संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष झालेला आहे. आम्ही इतर पक्षांपेक्षा खूप पुढे आहोत. अनेक ग्राम पंचायतींमध्ये सर्वांच्या सर्व जागा आम्ही जिंकल्या आहेत. एकीकडे लोकडाऊनमध्ये आपल्या पाठीशी उभे राहिलेले मोदीजी हे लोकांनी पाहिलं आणि सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकलाय. दुसरीकडे नागरिकांनी या सरकारकडे पाहिलं की त्यांनी शेतकऱ्यांना, मजुरांना, बारा बलुतेदारांना मदत केली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारच्या बाबत मनात रोष आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे तीनही पक्ष एकत्रित येऊनही भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष राहिला आहे. 

कोकणात घवघवीत यश

यंदाच्या ग्राम पंचायत निवडणुकीत विदर्भात भाजपाला मोठ्या प्रमाणार यश मिळालं, शिवाय कोकणत देखील यंदा भाजपाला भरघोस यश मिळताना पाहायला मिळतंय. विशेषतः सिंधुदुर्गात ८० टक्के ग्रामपंचायती जिंकून आम्ही यश मिळवलं आहे. आम्ही सत्तेत असताना रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. मात्र यंदा आम्हाला रत्नागिरीत, रायगड, ठाणे त्यामुळे कोकणात आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. 

सरकार कशा प्रकारे काम करत नाही...

गेल्या काही दिवसांपासून हे सरकार कशा प्रकारे काम करत नाही हे आम्ही लोकांना समजावून सांगतो आहोत. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. तीनही पक्ष एकत्रित येऊनही भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरलाय. आम्ही सातत्याने हे सांगत होतो की, जेंव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील तेंव्हा आमची स्पेस वाढत जाईल. 

चंद्रकांत पाटील यांचा होम पिचवर पराभव...

चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या होम पिचवर पराभवाचा सामना करावा लागलाय. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या गावात कमी अधिक प्रमाण होत असतं. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं. मात्र पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं. 

शिवसेनेबाबत काय म्हणालेत फडणवीस... 

शिवसेना हा पण महाराष्ट्र पक्ष नाही.  या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आम्हाला शिवसेना, काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि काही ठिकाणी आम्हाला काँग्रेसशी लढावं लागलं. या तीनही पक्षांचे आपापले भाग आहेत, तिथे ते मजबूत आहेत. भाजपचं असं नाही . म्हणूनच भाजपाची स्पेस वाढेल असं मी म्हणालो असल्याचं  फडणवीस म्हणालेत. 

gram panchayat election results reaction of opposition leader devendra fadanavis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com