जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड मध्ये आदिवासी बांधवांची भव्य रॅली

मुरलीधर दळवी
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुरबाड शहरात रॅली फिरल्यानंतर सर्व जण तहसीलदार कार्यालयात आले. तेथे मुरबाड पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादिर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुरबाड (ठाणे) : उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो, आला रे आला आदिवासी आला. आदिवासी बचाव जंगल बचाव अशा घोषणा देत ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे चार ते पाच हजार आदिवासींनी मुरबाड दणाणून सोडले. निमित्त होते जागतिक आदिवासी दिनाचे.

तालुक्याच्या सह्याद्री पर्वताच्या कान्या कोपऱ्यातून ते पाटगावच्या पठारा पर्यंतचा सर्व आदिवासी समाज मुरबाड येथे डोक्यात सफेद टोप्या त्यावर मी आदिवासी अशी अक्षरे रंगवलेली तर काहींचे लेंगा,पायजमा, टोपी असे सर्व कपडे घोषणांनी रंगवलेले, हातात पानांचे द्रोण, खांद्यावर घोंगडी अशी वेशभूषा करून चौका चौकात त्यांनी आदिवासी नाच केला या रॅली मध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्या रेखा कंटे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ दळवी, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे आदी नेतेही सामील झाले होते.

मुरबाड शहरात रॅली फिरल्यानंतर सर्व जण तहसीलदार कार्यालयात आले. तेथे मुरबाड पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादिर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: A grand rally of World Tribal Day in murbad