मुंबई : आजोबांनी नातवावर कोयत्याने वार करून केली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

scythe

मुंबई : आजोबांनी नातवावर कोयत्याने वार करून केली आत्महत्या

कासा - डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील किन्हवली पिंपळपाडा येथे आजोबा राजेश होलजी आंबात वय 52 वर्ष यांनी आपल्या घरा जवळ झोपलेल्या नातू तेजस वय साडेतीन वर्ष याच्यावर कोयत्याने प्राणघातक वार करून गंभीर जखमी केले आणि स्वतः आत्महत्या केले.

याबाबतची हकीकत अशी, किन्हवली पिंपळपाडा येथील आजोबा राजेश आंबात हे गेल्या महिनाभरापासून डोक्यावर परिणाम झाल्याने वेडसर वागत होता. त्याने ता. 6 रोजी दुपारी 4.30 च्या दरम्यान कोणी नसताना घराजवळ झोपलेल्या नातू तेजस याच्या पोटावर, खांद्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यात तेजसची आतडी बाहेर आली. या घटनेची माहिती कळताच आजोबाचा भाऊ भिवा आंबात व गावकरी एकत्र जमले. त्यांनी कासा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ एकत्र जमल्याने राजेश आंबात त्याच्या घरात लपून बसला. लोक मारहाण करतील या भीतीने दरवाजा बंद करून दबा धरून बसला. कासा पासून 40 ते 45 किमी लांब असलेल्या या गावात रात्री 9.30 दरम्यान पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे पोलीस पथकासह दाखल झाले. त्यांनी घराच्या मागून पोलिसांनी प्रवेश केला असता आरोपी राजेश आंबात याने नायलॉन दोरीने माळ्याच्या लाकडी वाश्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गावकऱ्यांनी गंभीर तेजस यास सेलवास येथील रुग्णालयात अती दक्षता विभागात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. पुढील तपास कासा पोलीस करीत आहेत.

Web Title: Grandfather Committed Suicide Attacking Grandson With Scythe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top