द्राक्षांची आवक वाढली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई - यंदा द्राक्षांचे उत्पादन वाढल्याने वाशीतील घाऊक फळबाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा द्राक्षांच्या दरात 20 ते 30 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मनसोक्त द्राक्षांचा आस्वाद घेता येत आहे. 

सध्या बारामती, तासगाव आणि फलटणमधून मोठ्या प्रमाणात द्राक्षे बाजारात येत आहेत. दररोज 1300 क्विंटल द्राक्षे बाजारात येत आहेत; त्यामुळे त्यांचे दरही कमी झाले आहेत. लांब आकाराची सोन्नाक्का आणि बिया नसलेल्या शरद सीडलेस द्राक्षांना मोठी मागणी आहे. चांगल्या दर्जाच्या 10 किलो द्राक्षांच्या पाटीसाठी 500 ते 900 रुपयांचा दर आहे; तर दुय्यम दर्जाच्या द्राक्षाच्या 20 किलोच्या पाटीसाठी 500 ते 800 चा दर आहे. या वर्षी द्राक्षाचे उत्पादन वाढल्याने दर खाली आले आहेत. 

एप्रिलपर्यत द्राक्षांचा हंगाम सुरू राहणार आहे. तोपर्यत दर कमी राहणार असल्याचे द्राक्षाचे व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले. द्राक्षाची आवक वाढल्याने घाऊक बाजारात द्राक्षांच्या चार, दोन किलोचे बॉक्‍सही मिळत आहेत. 100 ते 200 रुपये अशी त्यांची किंमत आहे. 

Web Title: grape arrivals increases