esakal | कोण म्हणतं दिवाळी अंक वाचत नाही; ऋतूरंग तीन वेळा छापावा लागला 
sakal

बोलून बातमी शोधा

कोण म्हणतं दिवाळी अंक वाचत नाही; ऋतूरंग तीन वेळा छापावा लागला 

दिवाळी अंक आता पुर्वी सारखा वाचला जात नाही.कोविड काळात दिवाळी अंक छापणेही शक्य नाही.या फक्त चर्चाच राहील्या आहेत.28 वर्षांपासून प्रसिध्द होणारा ऋतूरंग दिवाळी अंक यंदा तीन वेळा छापावा लागला.

कोण म्हणतं दिवाळी अंक वाचत नाही; ऋतूरंग तीन वेळा छापावा लागला 

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : दिवाळी अंक आता पुर्वी सारखा वाचला जात नाही.कोविड काळात दिवाळी अंक छापणेही शक्य नाही.या फक्त चर्चाच राहील्या आहेत.28 वर्षांपासून प्रसिध्द होणारा ऋतूरंग दिवाळी अंक यंदा तीन वेळा छापावा लागला.

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरे रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित

दिवाळी आणि दिवाळी अंक हे गेल्या अनेक दशकांचे ऋणानुबंध आहे.मात्र,गेल्या काही वर्षांपासून दिवाळी अंकाचा खप कमी होऊ लागलाय अशी तक्रार केली जात होती.पण,ऋतूरंग दिवाळी अंकाने ही तक्रार खोटी ठरवली आहे.यंदा ऋतूरंगचा अंक तीन वेळा छापावा लागला असे संपादक अरुण शेवटे यांनी सांगितले.दिवाळी अंक वाचणारा वाचक हा वेगळाच आहे.हा दिवाळी अंक फक्त दिवाळीतच नाही डिसेंबर जानेवारी पर्यंत वाचला जातो.नियमीत प्रसिध्द होणारी मासिक फारशी नसल्याने आता दिवाळी अंकाचा वाचक वाढत आहे.अशा शब्दात वाढलेल्या खपाचे गुपित अरुण शेवटे सांगतात.कवी गुलजार,अभिनेता अमिताभ बच्चन, माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे,शिवसेना नेते संजय राऊत, भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे, डॉ.अभय बंग, जेष्ट पत्रकार दिनकार रायकर, सकाळ मुंबईचे निवासी संपादक रवी आमले,मधुकर भावे,लेखक कवी रामदास फुटाणे, या व अशा अनेक मात्तबर व्यक्तींचेे लेख या अंकात वाचायला मिळतात.

हेही वाचा - संग्रही ठेवावा ‘सकाळ’चा दिवाळी अंक! प्रकाशन सोहळ्यात स्वप्नील जोशी यांचे कौतुकोद्‌गार

लेखकांनी मानधन परत केले 

य़ा अंकासाठी लेख लिहीलेल्या काही लेखकांनी त्यांचे मानधनही घेतले नाही. रामदास फुटाणे, संजय राऊत,साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, नामदेव अंजना, रवी आमले,आनंद आवधानी यांनी मानधन स्विकारले नाही.असेही अरुण शेवटे यांनी सांगितले.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )