जाणीव प्रतिष्ठाण "ग्रीन अर्थ" या प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व संगोपन उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

वज्रेश्वरी (ठाणे) : बेसुमार वृक्षतोड व जंगलतोडीमुळे झालेली वैश्विक तापमानातील वाढ अर्थात "ग्लोबल वॉर्मिंग" या भीषण समस्येवर एकमेव पर्याय म्हणजे "वृक्ष लागवड" फक्त वृक्ष लागवड नव्हे तर त्यांचे निरंतर संगोपन हा दृष्टीकोन व एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गणेशपुरी येथे जाणीव प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या तसेच मित्रमंडळींच्या वतीने एकूण 250 वृक्ष रोपे लागवड करण्यात आली. तसेच येत्या एक महिन्यात 500 इतकी वृक्ष रोपे लावण्यात येणार आहेत असा संकल्प करण्यात आला आहे. 

गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज समाधी परिसरात ही लागवड करण्यात आली प्रतिष्ठानच्या ह्या उदात्त कार्यास प.पू. श्री. दादा यांनी आशीर्वादरूपी भेट देऊन लागवड केली वाढत्या प्रदूषणास आळा बसावा म्हणून येथील  टेकडीवर अडिचसे झाडांची लागवड करण्यात आली. यात विविध भारतीय प्रजातींचा समावेश असलेली रोपे आणून सदस्यांनी यापूर्वीच श्रमदानातून येथील गणेशपुरी वाघमनी टेकडीवर खड्डे खोदले होते. प्रारंभी रोपाची लागवड कशा पद्धतीने करायची याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यानंतर सदस्यांनी हातात टिकाव, फावडे आणि पाण्याचे ड्रम घेवून टेकडीवर रोपे लावण्यास सुरुवात केली.ग्रीन अर्थ व जाणीव प्रतिष्टन सदस्यांनी रोपांची लागवड करण्यासाठी हातभार लावला.

यावेळी लागवड आणि प्लास्टिक मुक्तीही यावेळी करण्यात आली.यावेळी रोपांची लागवड करताना टेकडीवरील रोपांच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्याही लागवड करण्यासाठी आलेल्या लहान मुलांनी गोळा केल्या. याकार्यात लहान मुलांनीही अनेक रोपांची लागवड केली. ग्रामस्थ मंडळी स्वतः मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत होती. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीनंतर या रोपांची जोपासना करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. लागवड केलेल्या रोपांची जोपासना करणे, संरक्षण करणे यावर भर देण्यात आल्याची माहिती जाणीव प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांनी दिली.

Web Title: green earth project tree plantation janiv pratishthan