esakal | पनवेलची हळद तब्बल ९० जणांना पडली भारी, नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलची हळद तब्बल ९० जणांना पडली भारी, नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू आणि...

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जे घडतंय ते पाहून, वाचून किंवा ऐकून तुम्हाला असं नक्की वाटेल की इथले मुंबईतील नागरिक कोरोनाबाबत अजिबात सिरीयस नाहीत.

पनवेलची हळद तब्बल ९० जणांना पडली भारी, नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू आणि...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पनवेल : नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जे घडतंय ते पाहून, वाचून किंवा ऐकून तुम्हाला असं नक्की वाटेल की इथले मुंबईतील नागरिक कोरोनाबाबत अजिबात सिरीयस नाहीत. नवी मुंबईतील आणि पनवेलमध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. नवी मुंबईतील ४४ कंटेनमेंट झोनमध्ये ७ दिवसांसाठी पुन्हा एकदा एक आठवड्याचा कडकडीत लॉकडाऊन घेण्याचा निर्णयही झालाय. ही परिस्थिती कशामुळे ओढावतेय असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर याचं उत्तर म्हणजे ही बातमी. 

नवी मुंबईला लागून असलेल्या पनवेलमध्ये एक भीषण प्रकार घडलाय. पनवेलमध्ये नुकताच एका नवरदेवाच्या भावाचा मृत्यू झाला. या बरं गर्दी जमवू नका किंवा कोणतेही कार्यक्रम सोहळे एकत्र येऊन साजरे करू नका असं सांगितलं असतानाही लग्नातील हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आता नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्याच्याशी संपर्कात आलेलय सगळ्या ९० लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. 

मोठी बातमी हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

नक्की झालं काय ?

पनवेलमधील नेरे गावात १४ जून रोजी पाटील फॅमेलीमध्ये मुलाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम झाल्यानंतर २३ जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता नवऱ्या मुलाच्या भावाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या तब्बल ९० लोकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात २७ लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यानंतर आता हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. 

मोठी बातमी कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

दरम्यान सदर भीषण घटनेनंतर आता इथल्या परिसरात कुणीही विना परवानगी लग्नकार्य किंवा कोणतेही सोहळे करू नयेत. ठरलेल्या लग्नाची तहसीलदारांकडून रीतसर परवानगी घेऊन मगच लग्नसोहळा करावा. अशा सूचना आता या भागात देण्यात आल्यात. 

grooms brother lost life due to corona 90 people are tested as high risk contacts