कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

मुंबई : यंदा पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली का असा प्रश्न विचारायची आता वेळ आलीये. कारण मुंबईत तुफान बॅटिंग करणारा मान्सून यंदा जून महिन्यात गायब असल्याचं पाहायला मिळतंय. जून महिन्यात १४, १५,  १६ तारखेला मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुंबईत समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाण्याची कमतरता अशा कैचीत मुंबई सापडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना ज्या तलावांमधून पाणी मिळतं त्या तलावांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पावसाने येत्या काही दिवसांमध्ये हजेरी लावली नाही तर मुंबईकरांना कोरोनासोबत आणखी एका मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. 

मोठी बातमी या वर्षातील सर्वात मोठं प्रॉपर्टी डिल, दोन अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल 136 कोटी रुपये ...

२०१८ मध्ये झालेल्या कमी पावसामुळे मागील वर्षी म्हणजे जुलै २०१९ मध्ये मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. मात्र २०१९ मध्ये अगदी डिसेंबरपर्यंत पाऊस झाल्याने मुंबईत यावर्षी अद्याप पाणीकपात करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यात मुंबईकरांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहिला. 

यंदा एप्रिल महिन्यात मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या तलावांमध्ये २९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. २०१९ च्या तुलनेत यंदा उपलब्ध असेल पाणीसाठा हा तब्बल १९ टक्के जादा होता. मात्र २६, जून २०२० रोजी केलेल्या तपासणीत मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा कमी होताना पाहायला मिळतोय.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण १४.४७ लाख मिलियन लिटर पाणी साठ्यापैकी सध्या केवळ १.३६ लाख मिलियन लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच हा पाणीसाठा १० टक्कयांपॆक्षा खाली गेलाय. सध्या मुंबई शहराला दररोज ३ हजार ८०० लिटर पाणी पुरवलं जातं. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील ३० दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक आहे.  दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही पाणी पातळीवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगितलंय. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून पाऊस उशिराने येतोय असं निदर्शनास आलंय. 

मागील सहा वर्षात तीनदा जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणीपातळी १० टक्क्यांच्या खाली गेलीये. मुंबईला भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तुलसी आणि  विहार या सात तलावांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. 

only 9 percent water left in lakes that provides water to the mumbai city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com