शेतकरी टेक्नोसॅव्ही : नाशिकची भाजी थेट महामुंबईतील घरात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

मुंबई : कोरोनाची महामारी रोखण्यासाठी घरात राहा, असे आवाहन सरकार सातत्याने करीत आहे, पण महामुंबईतील भाजी मंडयांतील गर्दी कितीही उपाय केले तरी कमी होण्यास तयार नाही. पण त्यालाही आता पर्याय उपलब्ध होऊ पाहत आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने नाशिकची भाजी थेट मुंबईतील वडाळा, वरळी, कल्याण, नवी मुंबई, सानपाडा, ठाणे आदी शहरांतील घरांत पोहचत आहे.

हेही वाचा : अडीचशे वर्षांच प्रथमच : रमजानमध्ये महम्मद अली रोड सुना?

मुंबईतील कफ परेड, ब्रीच कँडी आदी परिसरातील अनेकांना थेट घरी भाजी मिळणाऱ्या योजनेची माहिती मुंबई पालिकेतील एका अधिकाऱ्याकडून सर्वांना समजली. नाशिकचा शेतकऱ्यांचा गट भाजी थेट घरी पुरवत असल्याचे समजताच अनेक मुंबईकरांनी त्यासाठी नोंदणी सुरू केली. भावही वाजवी असल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्त्वाचं : राज्यात 552  नवीन रुग्णांचे निदान

नाशिकचा शेतकऱ्यांचा गट टेक्नोसॅव्ही आहे. भाजीबाबतची नोंदणी ऑनलाईन करण्यात येते. ते डिलिव्हरी करण्यापूर्वी मेसेज पाठवतात. त्याचबरोबर ग्राहक आपली भाजी कुठे आहे याची माहितीही घेऊ शकतात. व्हॉटस्अॅप, फेसबुक तसेच अन्य अॅपच्या मदतीने नाशिक आणि पुण्यातील शेतकरी थेट महामुंबई परिसरातील ग्राहकांच्या संपर्कात आहेत. ते फळ आणि भाज्यांचे 8 ते 10 किलोची बास्केट तयार करतात. ती एका कुटुंबाची एक आठवड्याची गरज सहज भागवते. लॉकडाऊनच्या कालावधीत तर अशी सुविधा अनेकांसाठी फायदेशीर झाली आहे. त्याचबरोबर कोणीही मध्यस्थ नसल्यामुळे भावही आवाक्यात राहतात. 

वाचालयाच हवं : चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पा महाराष्ट्राच्या मदतीला...

मुंबईतील अनेक सोसायट्यांनी एकत्र येत नाशिकच्या शेतकऱ्यांकडे आपली मागणी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. सोसायट्यांचे प्रमुखच मागणी नोंदवत आहेत. यापूर्वी अनेक शेतकरी आपली भाजी आठवडा बाजारात विकत होते, पण आता ते मुंबई आणि ठाणे परिसरात आठवड्याला सहा ते बारा टन भाजी पाठवत आहेत.  

सरकारी अधिकाऱ्यांची मदत
नाशिकच्या सह्याद्री फार्मबरोबर सहा हजार शेतकरी जोडले गेले आहेत. ते प्रत्येकी 9 किलोचे किमान 300 बॉक्स मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी परिसरात वितरित करतात. दरम्यान, अकरा किलो भाजी पाचशे रुपयाला मिळत असल्याचेही सांगितले जात आहे. नवी मुंबई परिसरात पुणे, सांगली, नाशिक, सातारा आदी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत भाजीपुरवठा सुरू केला आहे. भाजी थेट घरात पोहोचवली जात आहे. त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com