रायगडमध्ये आढळला 'ग्रिफोन' गिधाडांचा थवा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेस्कर यांना श्रीवर्धन येथे जानेवारीत ७  हिमालयीन ग्रिफोन गिधाडे दिसली होती. त्यांनी माणगाव तालुक्‍यात याच प्रजातीची १५० पेक्षा अधिक गिधाडे दिसल्याची आज नोंद केली. त्यामुळे पक्षिनिरीक्षक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात गिधाडांसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने विविध प्रजातीची गिधाडे  जिल्ह्यात येत असावीत, अशी शक्‍यता पक्षिनिरीक्षक व्यक्त करतात. 

रायगड : वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेस्कर यांना श्रीवर्धन येथे जानेवारीत ७  हिमालयीन ग्रिफोन गिधाडे दिसली होती. त्यांनी माणगाव तालुक्‍यात याच प्रजातीची १५० पेक्षा अधिक गिधाडे दिसल्याची आज नोंद केली. त्यामुळे पक्षिनिरीक्षक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात गिधाडांसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने विविध प्रजातीची गिधाडे  जिल्ह्यात येत असावीत, अशी शक्‍यता पक्षिनिरीक्षक व्यक्त करतात. 

ही बातमी वाचली का? बंदीनंतरही 'या' माशाला मिळतीये खवय्यांची पसंती!

जानेवारीत श्रीवर्धन येथे नियमित पक्षिनिरीक्षण करत असताना शंतनु यांना पांढरपाठी आणि भारतीय गिधाडांसोबत ७  हिमालयीन गिधाडे दिसून आली होती. तशीच गिधाडे पुन्हा माणगाव तालुक्‍यात दिसून आली. त्यांची संख्या दीडशेपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाकीस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये या गिधाड प्रजातीचे मुख्य वास्तव्य असते. थंडीच्या मोसमात उत्तर भारतातील काही पट्ट्यात ती दाखल होतात.

ही बातमी वाचली का? सतत चिडवायचा म्हणून आवळला शेजारचा मुलाचा गळा 

असे आहे ग्रिफोन
ग्रिफोन गिधाडाचे वजन साधारणतः ८ ते १२  किलोपर्यंत असते. त्यांच्या फैलावलेल्या पंखांतील अंतर  ९ ते १० फूट असते, अशी माहिती शंतनु यांनी दिली. हिमालयात आढळून येणारे सर्वात मोठे आणि वजनदार गिधाड म्हणून आकाराने प्रचंड असलेल्या या हिमालयीन गिधाडांची ओळख माळढोक पक्ष्यानंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा पक्षी 
अशी आहे.

वन विभागाला यश 
पर्यावरणात गिधाडे नैसर्गिक सफाई कर्मचारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. रायगड जिल्ह्यात वन खात्याने राबविलेल्या गिधाड संवर्धन योजनांना याआधीच चांगले यश मिळाले आहे.

श्रीवर्धननंतर माणगाव तालुक्‍यात हिमालयीन ग्रीफोन गिधाडे आढळली आहेत. तशी ती इतर तालुक्‍यातसुद्धा आढळतात का, याचे निरीक्षण ठेवले पाहिजे. जिल्ह्यातील वातावरण चांगले असल्याचेच हे द्योतक आहे.
- तुषार पाटील, पक्षिनिरीक्षक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Gryphon' vultures found in Raigad!