जीटी रुग्णालयात डॉक्‍टरांना मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई - सीएसएमटी येथील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात (जीटी) रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागातील डॉक्‍टरांना मारहाण करून धमकावल्याचा प्रकार शनिवारी (ता. 31) सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी रुग्णाच्या भावासह मित्रालाही अटक केली. हिमांशू भुरके (वय 32), आशितोष झोरे (23) अशी आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

डॉ. विश्‍वजित वाकडे शनिवारी सकाळी जीटीबीच्या आपत्कालीन विभागात रुग्णांना तपासत होते. त्या वेळी हितेंद्र भुरके (वय 28) याला चक्कर आणि अस्वस्थतेमुळे रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याला नेमका काय त्रास होत आहे, याची विचारपूस डॉ. वाकडे करीत होते. त्या वेळी हितेंद्रने नातेवाइकांकडे पिण्यासाठी पाणी मागितले; मात्र पाणी प्यायल्यास आणखी त्रास होण्याची शक्‍यता असल्याने डॉ. वाकडे यांनी पाणी देण्यास नकार दिला. त्या वेळी हितेंद्रला राग अनावर झाल्याने त्याने डॉ. वाकडे यांना लाथेने मारहाण केली. हितेंद्रचा भाऊ हिमांशू आणि मित्र आशितोष यांनीही डॉ. वाकडे यांना धक्काबुक्‍की करीत मारण्याची धमकी दिली. 

Web Title: GT hospital Doctor Beating