अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने घेतला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

दहावी-बारावीच्या परीक्षांत मोठ्या अक्षरांतील प्रश्‍नपत्रिका देण्याची कोर्टात दिली हमी

मुंबई ः अंशतः अंध विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षांत मोठ्या अक्षरांतील प्रश्‍नपत्रिका देण्यात येईल, अशी हमी राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्याबाबत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाला प्रस्ताव सादर करावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे अंशतः विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

`गंगूबाई काठियावाडी` वास्तवापेक्षा वेगळाच? कोण म्हणतंय असं...

राज्य सरकारने 2018 मध्ये जारी केलेल्या अध्यादेशानुसार अंशत: अंध विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांतील प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या श्रुती पाटील या अंशत: अंध आणि सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त विद्यार्थिनीने अशी मागणी शिक्षण मंडळाकडे केली होती. ही मागणी मंडळाने अमान्य केल्यामुळे तिने ऍड्‌. प्रॉस्पर डिसोझा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्या. एस. एम. शिंदे आणि न्या. व्ही. जी. बिश्‍त यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

घरच्या घरी `ब्लड शुगर` कंट्रोेल करण्याचे सोपे पर्याय...

राज्यभरातून हजारो अंशत: दृष्टिहीन विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसतात. त्यामुळे त्यांना मोठ्या अक्षरांतील प्रश्‍नपत्रिका मिळायला हवी, असे याचिकादार विद्यार्थिनीच्या वलिकांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षण मंडळाच्या सचिवांनी तशी हमी दिली. संबंधित विद्यार्थिनीलाही तशी प्रश्‍नपत्रिका देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्याबाबत नोंद करून उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. 
राज्य शिक्षण मंडळाने अध्यादेश जारी करूनही कार्यवाही न केल्याबद्दल खंडपीठाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी न्यायालयात यायचे का, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला होता.

Guaranteed in court for issuing uppercase question papers in Class X & XII examinations


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guaranteed in court for issuing uppercase question papers in Class X & XII examinations