Mumbai : डोंबिवलीत मध्य रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली; दोन ठार, तिघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guard wall of Central Railway collapsed in Dombivli Two workers killed three injured

Mumbai : डोंबिवलीत मध्य रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली; दोन ठार, तिघे जखमी

मुंबई : डोंबिवलीत मध्य रेल्वेचे संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू असताना जुनी भिंत अंगावर कोसळून त्यात 2 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 3 मजूर यात जखमी झाले असून त्यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल विष्णुनगर पोलीस ठाण्यात ठेकेदार व सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

पश्चिमेतील कोपररोड परिसरात सिद्धार्थ नगर येथील रेल्वे च्या जागेतील अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्याजागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वेच्या वतीने सिमेंट काँक्रीटीकरणची संरक्षक भिंत बांधण्यात येत होती. त्यासाठी 12 मजूर गेले महिनाभरापासून काम करत होते. बरेचसे काम होत आले होते, कोपर उड्डाण पुलाजवळील भिंतीचे काम करण्यासाठी खड्डा खणण्यात येत होता. मात्र या ठिकाणी जुनी रेल्वेची भिंत तशीच होती. बुधवारी सायंकाळी 4.15 च्या सुमारास ही जुनी भिंत मजूर काम करत असताना त्यांच्या अंगावर कोसळली. आणि त्याखाली 5 मजूर दबले गेले.

काही तरी पडल्याचा आवाज आल्याने बाजूच्या परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत तरुणांनी पहाणी केली असता एक जखमी मजूर दिसुन आला तेच त्यांनी बांबूच्या आधाराने भिंतीचा मलबा हटवित पाचही जणांना बाहेर काढले. त्यांना त्वरित बाजूलाच असलेल्या पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी हलविले असे मदत केलेल्या मयूर भोरे या तरुणाने सांगितले. विष्णूनगर पोलीस, अग्निशमन दल यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात हलविले होते. जखमींवर उपचार सुरू असतानाच मल्लेश चव्हाण व बंडू कुंवासे यांचा मृत्यू झाला. तर माणिक पवार, विनायक चौधरी व युवराज गुत्तलवार या जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून 2 मजूर ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ठेकेदार, सुपरवायझर यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. संपूर्ण घटनेची पहाणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली.

जखमी मजूर

माणिक पवार (वय 62)

विनायक चौधरी (वय 35)

युवराज गुत्तलवार ( वय 35 )

मृत

मल्लेश चव्हाण ( वय 35 )

बंडू कुंवासे (वय 50)

मृत मजूर हे मूळचे तेलंगणा व गडचिरोलीचे, तर जखमी मजूर हे आंध्रा येथील असल्याचे समजते. दिवा येथे काही मजूर राहण्यास होते. तर काही डोंबिवली मध्ये रहात होते.

हेही वाचा: मुंबई : ओला चालकानं अनेक वाहनांना उडवलं, विद्यार्थ्यांसह आठ जण जखमी

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून 2 मजूर ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ठेकेदार, सुपरवायझर यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. संपूर्ण घटनेची पहाणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली.

हेही वाचा: ABG Shipyard Scam : 22 हजार कोटींचा घोटाळा! शिपयार्डच्या माजी अध्यक्षांना अटक

जखमी मजूर

माणिक पवार (वय 62)

विनायक चौधरी (वय 35)

युवराज गुत्तलवार ( वय 35 )

मृत

मल्लेश चव्हाण ( वय 35 )

बंडू कुंवासे (वय 50)

मृत मजूर हे मूळचे तेलंगणा व गडचिरोलीचे, तर जखमी मजूर हे आंध्रा येथील असल्याचे समजते. दिवा येथे काही मजूर राहण्यास होते. तर काही डोंबिवली मध्ये रहात होते.

Web Title: Guard Wall Of Central Railway Collapsed In Dombivli Two Workers Killed Three Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News