
Virar Latest News: राज्यात सत्ता आल्या नंतरही पालक मंत्र्यांच्या बद्दल कोणतीही हालचाल होत नव्हती अखेर पालकमंत्री जाहीर करण्याला काल मुहूर्त मिळाला.भाजपने पालघर जिल्ह्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण माहिती असलेल्या गणेश नाईक यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन संघटना वाढीकडे लक्ष दिल्याचे दिसत आहे
यापूर्वी पालघर जिल्ह्याला दादा भुसे आणि रवींद्र चव्हाण हे दोन पालकमंत्री मिळाले होते परंतु यांचा तसा पालघरशी कोणताही संबंध आला नव्हता किंवा या जिल्ह्याची त्यांना माहिती ही नव्हती त्या मुळे अनेक अडचणी येत होत्या.