esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ई-पीक नोंदणीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कासा : डहाणू (Dahanu) तालुक्यातील वेती, वरोती, मुरबाड, वांगरजे, पिंपळशेत, बसवत पाडा येथील शेतक-यांसाठी (farmer) शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ई पीक नोंदणी, शेतीविषयक माहिती, पीक कर्ज, गोपीनाथ मुंडे पीक योजना (Gopinath Munde Crop Scheme) , सातबारा नोंदणी, शेतीविषयक पोर्टल कसे वापरावे, याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा: ग्रामविकास मंत्रालयाचे 1,500 कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच : सोमय्यांचा आरोप

वेती वरोती ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर, महसूल अधिकारी एस. भरसट, कृषी सहायक अजय आंबेकर, कृषीतज्ज्ञ शेतकरी कैलास वसवत आदी या वेळी उपस्थित होते. सध्या अनेक शेतकऱ्यांना जोरदार पावसामुळे भातपिकांचे नुकसानाचे संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत गान्हाणे मांडले. अधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

loading image
go to top