कासा : गुजरातमधील बिलीमोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पादचाऱ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील सोनसाखळी लुटली होती. या प्रकरणातील चोराला चारोटीतून ताब्यात घेतले आहे..वलसाड गुन्हे शाखा, तलासरी पोलिसांना सोनसाखळी चोरीतील संशयित असदुल्ला खान (४७, रा. आंबेवली, इंद्रानगर झोपडपट्टी, पश्चिम मुंबई) हा दुचाकीवरून गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. .Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे.या माहितीच्या आधारे दापचेरी येथील आरटीओ तपासणी नाक्यावर पोलिसांनी सापळा लावला होता. या वेळी चालकाने दुचाकी भरधाव पुढे नेल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दुचाकीचे लोकेशन चारोटी पोलिसांना देतामा दुपारी १२.१५ वाजता संशयित दुचाकीला टोलनाक्यावर अडवून खानला ताब्यात घेतले..राज्यभरात नऊ गुन्हे दाखलबिलीमोरा पोलिस ठाणे तसेच वलसाड आर्थिक गुन्हे पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार.चोरीच्या दुचाकीचा वापरबिलीमोरा पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपीची दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी विठ्ठलवाडी, ठाणे शहर येथे गुन्हा दाखल आहे. त्यामुळे प्रकरणाचा तापस सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.