शिवसेना म्हणजे काय? गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरून सांगितला अर्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Patil

शिवसेना म्हणजे काय? गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरून सांगितला अर्थ

मुंबई : आज शिवसेनेची मुंबईमध्ये जाहीर सभेत नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली, त्यांनी सभेत बोलताना जो-जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो अशी गर्जना त्यंनी केली.दरम्यान या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. (uddhav thackeray political rally in Mumbai)

1984 साली शिवसेनेने ठाण्यानंतर आगेकुच केली त्या काळातील मी शिवसैनिक आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले, यावेळी त्यांनी शिवसेना या शब्दाचा अर्थ देखील सांगितला ते म्हणाले की, शिवसेनेतील शि म्हणजे शिस्तबध्द, व म्हणजे वचनबध्द, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे नामर्दाना जिथं जागा नाही, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, राज्यात बऱ्याच घटना घडतायत, पक्षांमध्ये माणसे फोडताना पाहीलं, माणसांनी पक्ष बदलता पाहीलं, लोक शिवसेनेच्या जोरावर मोठी झाली असे गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा: पुढचे दोन दिवस विदर्भ तापणार! हवामान विभागाची माहिती

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, शिवसेनेला संपवायला निघाले आहेत, तुमचा बापजादा, खापर पणजोबा, खापरपणजोबाचा पणजोबा जरी आला, तरी शिवसेना तुमच्याने संपू शकत नाही. शिवसेना फक्त पक्ष किंवा संघटना नाही, तर शिवसेना एक विचार आहे. पक्ष-संघटना संपतात पण विचार संपू शकत नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा: "सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर

जोपर्यंत ही पृथ्वी, सुर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बाळासाहेबांचे विचार संपू शकत नाही आणि जोपर्यंत बाळासाहेबांचे विचार संपणार नाहीत तोपर्यंत शिवसेना संपवणारा कोणी जन्माला येऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Gulabrao Patil Explained The Meaning Of Word Shivsena In Mumbai Uddhav Thackeray Political Rally

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv Sena
go to top