सत्तेसाठी भाजपचे वाट्टेल ते 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - अकोला महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी एमआयएमसारख्या पक्षाची युती करते, तिथे उल्हासनगरमध्ये कलानीसाठी पायघड्या घातल्या, तर त्यात नवल ते काय, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या प्रवृत्तीचा आणि टीम ओमी कलानी यांचा समाचार घेतला. 23 तारखेपर्यंत भाजपचे "अच्छे दिन' असून नंतर त्यांना उतरती कळा लागल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी येथे व्यक्त केला. 

शनिवारी (ता.18) उल्हासनगर पूर्वेकडील सत्रामदास रुग्णालयानजीक 26 सेक्‍शनमधील शिवसेनेने आयोजित केलेल्या चौकसभेत गुलाबराव पाटील बोलत होते. ते म्हणाले की, याच भाजपने काही वर्षांपूर्वी कलानींच्या दहशतीविरोधात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेचे नेतृत्व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. आता याच भाजपने कलानीशी हातमिळवणी करून मुंडेंच्या विचारांना हरताळ फासल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला. धक्‍क्‍यातून सावरण्याचे बळ फक्त शिवसेनेतच आहे. शिवसेनेच्या बळावर राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. असाच धक्का छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही दिला होता; मात्र शिवसेना सोडलेल्यांची काय गत आहे, असा सवाल करतानाच यांच्याकडे गडगंज पैसा असला, तरीही त्यांना रात्री झोप येत नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: gulabrao patil in ulhasnagar