विरारमध्ये भरदिवसा गोळीबार; तीन दिवसांत दोन घटना | Virar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gun

विरारमध्ये भरदिवसा गोळीबार; तीन दिवसांत दोन घटना

नालासोपारा : विरार पूर्व बरफपाडा येथे एका व्यक्तीवर आज (ता. २८) दोन गोळ्या झाडून (Gun bullet firing) आरोपी फरारी झाले आहेत. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर विरारच्या संजीवनी रुग्णालयात (Sanjeevani hospital) उपचार सुरू आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात (Virar Police station) आरोपीविरोधात गुन्हा दाखल (FIR Filed) केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक रवाना केले आहेत. तीन दिवसांत दोन गोळीबाराच्या घटना घडल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: नवी मुंबईतील शहरातील वृक्षसंपदा वाढणार; ४७ हजार देशी रोपांची लागवड

आसाराम सदाशिव राठोड (वय ४९, मूळ रा. जिल्हा परभणी) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते विरार पूर्व बरफपाडा येथे रूम भाड्याने घेऊन राहत असून, मिस्त्रीचे काम करतात. आज दुपारी साडेपाचच्या सुमारास बरफपाडा येथे रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडून फरारी झाले आहेत.

मुलाच्या प्रेमविवाहामुळे गोळीबार?

जखमी राठोड यांच्या मुलाचा प्रेमविवाह झालेला आहे. याच प्रेमविवाहाचा राग मनात धरून, त्यांच्यावर एक वर्षांपूर्वी ही एकदा फायरिंग झाली होती. पण त्यात त्यांना जास्त दुखापत न झाल्याने त्यांचा जीव वाचला होता. आजच्या फायरिंगमध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Gun Bullet Firing Two Incidents Happened In Three Days At Virar Crime News Update Nss91

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime NewsFIRvirar