फडणवीस-शहांना विनंती अन् राणेंचे आभार; तुरुंगाबाहेर सदावर्ते म्हणाले...

आपण तुरुंगातून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायला सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Gunaratn Sadavarte
Gunaratn Sadavarte

मुंबई मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक विनंती केली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे त्यांनी आभार मानले आहेत. (Gunaratn Sadavarte gives thanks to Devendra Fadnavis Amit Shah request to Narayan Rane)

Gunaratn Sadavarte
नवनीत राणा, वकिलांमध्येच नाही एकवाक्यता; पत्रातून समोर आला गोंधळ

सदावर्ते म्हणाले, "संविधानाचा रक्षणकर्ता जय श्रीराम म्हणणारा मी संविधानाच्या उद्देशिकेची देशाला ओळख करुन देणारा वकील असून हिंदुस्तानी कष्टकऱ्यांचा कैदी नंबर ५६८१ आहे. मी कष्टकऱ्यांसाठी लढलो, जे एसटी कर्मचारी कामावर गेले ते काही कोणाच्या सांगण्यावरुन गेले नाहीत. गुणरत्न सदावर्तेंनी जेलमधून सांगितलं होतं की, कष्टकऱ्यांनो तुम्ही कामावर जा. कारण सहा महिने माझे कष्टकरी दुखवट्यात होते. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणं सत्तर वर्षात टाळ्या पिटाळून घेतलेल्यांना शक्य झालं नाही, त्यांनी केवळ राजकारण केलं. पण या कष्टकऱ्यांनी सहा महिन्यात ते मिळवलं"

Gunaratn Sadavarte
"अभिनंदन आणि आशावाद"; एलॉन मस्क यांच्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी खास पोस्ट

एसटी विलिनिकरणाचा लढा आणि बँकेचा लढा हे दोन्ही लढे अपुरे नाही तर पुर्णत्वाकडे जाणारे लढे आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना मी विनंती करतो की आमच्या हत्येचा कट रचला जात असून याबाबत त्यांनी योग्य ती पावलं उचलावीत. तसेच नारायण राणे यांनी माध्यमांसमोर येऊन आमच्याबाबत सरकारला सुनावल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, असंही सदावर्ते यावेळी म्हणाले.

Gunaratn Sadavarte
करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा दिलासा

सदावर्ते पुढे म्हणाले, "मी असं ठरवलं होतं की सरकारला जे करायचं ते करु दे, त्यांना जसं वागायचं ते वागू दे. पण आपण आपलं तत्वं सोडायचं नाही. त्यामुळं चिंतनासाठी मी लॉकअपमध्ये गेल्यापासून केवळ पाणीच प्यायलो आहे. तरीसुद्धा हा आवाज आहे तसा शाबूत आहे"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com