
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही परवानगी देण्यात आली आहे. याबाबत आंदोलकांकडून आझाद मैदान पोलिसात रितसर अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलावर कडाडून टीका केलीय. जरांगेंच्या आंदोलनाने कायद्याची पायमल्ली होत असून जरांगेला त्याच्या गावी पाठवा असा एकेरी उल्लेख करत सदावर्तेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. जरांगे पहिल्याच आंदोलनात नियम मोडणार असतील तर पुढेही हीच साखळी पुढे राहील. कायद्याचं राज्य आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो याच्या आधारे पोलिसांनी जरांगेचे लाड बंद करावेत. त्याला गोंजारणं बदं करा, उचला आणि जरांगेला अटक करून न्यायालयात हजर करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही असं सदावर्तेंनी म्हटलंय.