Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gunaratna Sadavarte

गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं प्रकाशझोतात आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते हे आता एसटी महामंडळ सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभा करणार आहेत. अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचं काँग्रेसचं वर्चस्व आहे. त्यामुळं आपलं पॅनल उभं करत आणि त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना उमेदवाऱ्या देऊन सदावर्तेंकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायानं शरद पवारांना आव्हान देण्यात येणार आहे. यासंदर्भात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे.

सदावर्ते यांनी मुंबईत त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. एसटी कष्टकरी जनसंघ नावाने ही संघटना कार्यरत असणार असून एसटीच्या बँकेचं पॅनल ही संघटना लढवणार आहे.(Gunaratna Sadavarte will contest ST Corporation Bank elections)

सदावर्ते यांनी मुंबईत त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. gunaratna sadavarte

सदावर्ते यांनी मुंबईत त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. gunaratna sadavarte

यासंदर्भात सदावर्तेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. माफी न मागितल्यास त्यांना कोर्टात खेचणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 'डंके की चोट पे' आम्ही विलीनीकरण करून घेणार आहोत. राम मंदिर व्हावं म्हणून त्या केसमध्ये मी आणि माझी पत्नी वकील होतो. रामजन्म भूमीच्या लढ्यात आम्ही सहभागी होतो. यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सदावर्तेंनी केली. नाही तर आम्ही कोर्टात जातो, असा इशारा त्यांनी दिलाय.

एसटी महामंडळाची बँक ही सहकाराची बँक असून ती एक स्टेट आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे, ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. कोणाला इथं भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिलेली नाही. त्यामुळं कष्टकरी एसटी कर्मचारी आपली स्वतःची माणसं निवडतील.

आत्तापर्यंत या बँकेवर पॉलिटिकल बॉस उभे केले जात होते, ही बुजगावणी एसटी कर्मचाऱ्यांना १४ ते १५ टक्के व्याजानं कर्ज द्यायचे, यातून त्यांचं प्रचंड शोषण होत होतं. इतर राज्यांसाठी मात्र ७ ते ८ टक्के व्याजदर दिला जातो. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा असतानाही या राजकारण्यांकडून आपल्या मर्जितल्या लोकांना आणि इतर राज्यांना कर्जे दिली जातात. आमचं म्हणणं आहे की तिकडं सात टक्के देता तर इथं का नाही?

  • पाच लाख महाराष्ट्रातले कष्टकरी सोबत घेणार आहे

  • प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने नव्या संकल्पना आहेत

  • गेल्या 70 वर्षात कष्टकऱ्यांसाठी काम झालं नाही

  • कर्मचाऱ्यांची टिंगल केली

  • गिरणी कामगार होईल, अस म्हंटल गेलं पण कोर्टाने निर्णय दिला

  • गांधीवादींनी या देशाची फसवणूक केली

  • आतापर्यंत राजकीय पक्षाच्या आधारावरील कर्मचारी संघटना आहेत.

  • नथुरामजी गोडसे यांनी सांगितलं की महात्मा गांधी यांनी शेवटच्या वेळी हे राम अस म्हटलं नाही

  • आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला

Web Title: Gunratna Sadavarte Declared His Political Party Name

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gunaratna Sadavarte
go to top