
मुंबईत सोमवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली. सीएसएमटी परिसरात पी डी मेलो रोडवर रात्री साडे दहा वाजता गोळीबार झाला. यात एक जण जखमी झाल्याची माहिती समजते. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सेंट जॉर्ज रुग्णालया जवळच हा गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास माता रमाबाई आंबेडकरनगर पोलीस करत आहेत.