मुलीचा विनयभंग करणाऱ्या चायनीज भेळविक्रेत्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या चायनीज भेळविक्रेत्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या चायनीज भेळविक्रेत्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
कांदिवली परिसरात राहणारी आठ वर्षांची मुलगी चायनीज भेळ खाण्यासाठी घराजवळील विक्रेत्याकडे गेली.

या भेळविक्रेत्याने तिला बटाटे सोलण्यासाठी मदत करण्यास सांगितले. त्यावेळी काही कामाचा बहाणा करून भेळविक्रेता या मुलीला घरी घेऊन गेला आणि तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी कांदिवली पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला 5 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने दिला.  

 web title : guy arrested for molesting girl


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guy arrested for molesting girl