esakal | मुंबईतील चौपाट्यांचा होणार कायापालट ? रेती बंदरावर उद्यानाचे आकर्षण
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai beach

मुंबईतील चौपाट्यांचा होणार कायापालट ? रेती बंदरावर उद्यानाचे आकर्षण

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले मुंबईतील चौपाट्या (Mumbai Beaches) म्हणजे वाळूतील धमाल त्यानंतर भेलपुरीवर ताव एवढाचा आतापर्यंत अर्थ होता. मात्र,आता मुंबईतील चौपाट्यांचे रुप (beach development) पालटतेय. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दादर चौपाटी (Dadar Beach) पुन्हा जिवंत झाली आहे.तर,अतिक्रमणाच्या विळख्यातील माहिमच्या रेती बंदरवर आता सुंदर उद्यान बहरले (mahim Gardens) असून या किनाऱ्यालाही चौपाटीचे रुप आले आहे. गिरगाव चौपाटीलाही (Girgaon beach) आता नवे आकर्षण तयार होत आहे.

हेही वाचा: आरोपी वर्वरा राव यांची जामीनाचा अवधी वाढवण्यासाठी हायकोर्टात धाव

गिरगाव चौपाटी येथे जुनी पर्जन्यवाहीनी आहे.त्या पर्जन्यवाहीनीवर व्हिव्यूंग डेक तयार करण्यात येत आहे.येत्या तीन महिन्यात हा डेक तयार होणार आहे.तर,दादर किनाऱ्यावरही पदपथ तयार करण्यात आला आहे.त्यावरुन आता नागरीकांना फेरफटका मारता येत आहे.काही वर्षांपुर्वी पर्यंत हा किनाराच नामशेष होईल अशी भिती होती.मात्र,पालिकेच्या प्रयत्नाने या किनाऱ्याचा पुर्नजन्म झाला आहे.

माहिमचा समुद्र किनारा कधीच पर्यटनाच्या नकाशावर नव्हता.मुंबईत जन्माला आलेल्या किमान दोन पिढ्यांनीही हा किनारा पाहिला नव्हता.अतिक्रमणाने या ऐतिहासिक किनाऱ्याचा घात केला होता त्याच बरोबर समुद्राच्या लाटाच्या तडाखान्यानेही किनाऱ्याची झिज झाली होती.महानगर पालिकेने सहा कोटी रुपये खर्च करुन हा किनारा पुन्हा जिवंत केला आहे. मुंबईतील खाडी आणि समुद्राच्या किनाऱ्यांवर अनेक शतकां पुर्वीचे किल्ले आहेत.यात शिवडी येथील किल्याची महानगर पालिकेने काही वर्षांपुर्वी डागडूजी केली आहे.तर,वांद्रे येथील किल्लाही प्रसिध्द आहे.

हेही वाचा: डोंबिवलीत खड्ड्यांची समस्या जैसे थे; मनसेचे पुन्हा आंदोलन

पर्यटकांच्या अपेक्षा काय ?

-स्वच्छता

-स्वच्छ स्वच्छतागृह

-चेंजींग रुम

-सुरक्षीतता

-करमणुकीचे पर्याय

- इतर किनाऱ्याचे काय

जुहू किनारा हा उपनगरातील सर्वात प्रसिध्द किनारा आहे.या ठिकाणी महानगर पालिकेने काही वर्षांपुर्वी आकर्षण रोषणाई केली होती.

-गोराई किनारा हा मुंबईतील गावाचा फिल देणार आहे.गोराई गावात इस्ट इंडियन संस्कृतीचे दर्शन घडते.इतर किनाऱ्यांच्या तुलनेने या किनाऱ्यावरील पाणी स्वच्छ आहे.पर्यटकांची मोठी गर्दी होत असली तरी प्राथमिक सुविधा या किनाऱ्यावर पुरेशा नाहीत.

-आस्का,मार्वे हे किनारे मुंबईतील गावांचा फिल देणारे आहेत.या ठिकाणीही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.

loading image
go to top