दसऱ्यापर्यंत जीम सुरू होणार? जीम व्यवसायीकांशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री सकारात्मक

तुषार सोनवणे
Saturday, 17 October 2020

मुख्यमंत्री लवकरच जीम सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - राज्यात मिशन बिगीन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू होत आहेत. टप्प्याटप्याने राज्य सरकार लॉकडाऊन शिथिल करीत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिण्यांपासून जीम सुद्धा बंद आहेत. राज्यातील जीम व्यवसायीकांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत जीम सुरू करण्याबाबत परवानगी देण्याची विनंती केली. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच जीम सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.

कृती दलाचे अध्यक्ष-सदस्य असमर्थ! डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली नवीन दल गठीत 

राज्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये अर्थकारणाला गती आली आहे. कोरोना संसर्गामुळे बंद असलेले व्यवहार हळुहळु पुर्वपदावर येत आहेत. लॉकडाऊनमुळे जीम व्यवसायीकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता तरी राज्यातील जीम सुरू करण्याची परवानगी द्यावी याकरीता जीम व्यवसायीकांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली आहे.. या कॉन्फरन्समध्ये सकारात्मक चर्चा झाली असून राज्यात दसऱ्यापर्यंत जीम सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु जीम सुरू करीत असताना मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन केले तरच जीम सुरू करण्यास परवानगी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या प्रतिनिधी मंडळाला सांगितल्याचे कळते आहे.

--------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gym will start till Dussehra in the state?

टॉपिकस