मामेभावाशी बळजबरीनं लग्न लावून दिलं, पुन्हा पुन्हा अत्याचार; हाजी मस्तानच्या मुलीची न्यायासाठी मोदी-शहांकडे विनवणी

Haseen Mastan Mirza : मामाच्या मुलासोबत जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा, बलात्कार केल्याचा आणि हत्येचा प्रयत्न करून मालमत्ता बळकावल्याचा आरोप हाजी मस्तानची मुलगी हसीनने केलाय.
Haseen Mastan Appeals To Modi Shah Over Assault Claims

Haseen Mastan Appeals To Modi Shah Over Assault Claims

Esakal

Updated on

अडरवर्ल्डचा कुख्यात डॉन हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिनं पतीवर खळबळजनक आरोप केले आहेत. मामाच्या मुलासोबत जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा, बलात्कार केल्याचा आणि हत्येचा प्रयत्न करून मालमत्ता बळकावल्याचा आरोप तिनं केलाय. या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तिनं मदत मागितलीय. हसीन मिर्झाने आरोप केला की, १९९६मध्ये अल्पवयीन असतानाच माझं जबरदस्तीनं मामाच्या मुलासोबत लग्न लावून दिलं गेलं. त्याने माझ्यावर अत्याचार केले, शारीरिक आणि मानसिक छळ केला. माझ्या ओळखीचा वापर करून मालमत्ता हडप केली. त्याचं माझ्याआधी ८ वेळा लग्न झालं होतं असंही हसीनने म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com