दिव्यांग धोरणाच्या मसुद्यावर सूचना पाठविण्याचे आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर अंतिम स्वरूप देण्यासाठी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून तसेच जनतेकडून सूचना, अभिप्राय मागविले आहेत. संबंधितांनी आपल्या सूचना 23 मे 2017 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग धोरणाचा मसुदा नागरिकांना पाहण्यासाठी; तसेच सूचना व अभिप्राय यांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील हा मसुदा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. काही सूचना, अभिप्राय असल्यास 23 मेपर्यंत acdisability2017@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अथवा अपंग कल्याण आयुक्तालय, 3 चर्चरोड, पुणे-01, या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन अपंग कल्याण आयुक्तांनी केले आहे.

Web Title: handicaped policy information