अपंग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाला अटक

भगवान खैरनार
बुधवार, 11 एप्रिल 2018

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील ओसरविरा पैकी आंब्याचापाडा येथील एका अपंग अल्पवयीन मुलीशी रात्री अडीच वाजता झोपेत अतिप्रसंग करणार्‍या दिलीप काळू ताठे (वय 30) या तरूणाला मोखाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

या घटनेबाबत मोखाडा पोलीसांनी दिलेली माहीतीनुसार, तालुक्यातील ओसरविरा पैकी आंब्याचापाडा येथील एक अल्पवयीन अकरा वर्षाची अपंग मुलगी आपल्या कुटुंबासह घरात झोपली होती. रात्री अडीचच्या सुमारास याच पाड्यातील दिलीप काळू ताठे हा घरात शिरून तिचे तोंड दाबून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रकार करू लागला. त्यावेळी मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मुलीची आई झोपेतून जागी झाली. या मुलीने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. 

या घटनेविषयी मुलीच्या पालकांनी मोखाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल केली. त्यानुसार मोखाडा पोलिसांनी तातडीने नराधम दिलीप ताठे यास अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायधान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे करत आहेत. 

Web Title: handicapped girl raped accused arrested