esakal | दिव्यांगाना लोकलचे तिकिट, पास मिळण्याचा तिढा सुटला | Handicapped
sakal

बोलून बातमी शोधा

Train

दिव्यांगाना लोकलचे तिकिट, पास मिळण्याचा तिढा सुटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासासाठी (train travelling) अपंगांना (handicapped) तिकीट खिडकीवर (ticket counter) सवलतीचे पास (pass), तिकीट देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. याविरोधात रेल्वे प्रशासन (railway authorities), राज्य सरकारकडे (mva government) तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नव्हती.

हेही वाचा: Mumbai : साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

मात्र, अपंग कल्याण आयुक्तालयात तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वेने त्याची दखल घेतली. एप्रिलमध्ये सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. अपंग आणि त्यांच्यासोबत एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली. मात्र, अपंगांना उपनगरी रेल्वेचे सवलतीचे पास आणि तिकीट देण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नकार देण्यात आल्याच्या तक्रारी अंपगांनी केल्या.

राज्य सरकारच्या आदेशाची प्रत दाखवूनही सवलतीचे पास, तिकीट न देता सामान्य पास आणि तिकीट दिले जात होते. अपंग कल्याण आयुक्तालयाच्या आदेशानंतर रेल्वेने सवलतीचे पास व तिकीट देण्याविषयी निर्णय घेतल्याचे निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी सांगितले.

loading image
go to top