हापूसची युरोप वारी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाशीतील घाऊक फळ बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हापूसच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. आखाती देशांबरोबरच आता लंडन आणि युरोपमध्येही हापूसची निर्यात सुरू झाली आहे. बाजारात येणाऱ्या आंब्यांपैकी 10 टक्के आंबे निर्यात केले जात आहेत. काही दिवसांनी ही निर्यात आणखी वाढेल, असा विश्‍वास निर्यातदारांनी व्यक्त केला. 

घाऊक फळ बाजारात सध्या कोकणातून 50 ते 55 हजार आंब्याच्या पेट्यांची आवक होत आहे. कर्नाटकमधून 36 ते 38 हजार पेट्यांची आणि 60 ते 65 टन खुला आंबा दररोज बाजारात येत आहे. त्यामुळे आंब्याच्या निर्यातीसाठीही चांगले वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यापासून दुबई, कतार, कुवेतसारख्या आखाती देशांत आंब्याची निर्यात सुरू झाली होती; परंतु आता या महिन्यापासून लंडन आणि युरोपला निर्यात सुरू झाली आहे. आंब्यावर हॉट वॉटर ट्रीटमेंट करून तो निर्यात केला जात आहे. समुद्र आणि हवाई मार्गाने ही निर्यात सुरू आहे. हवाई मार्गाने आंबा लवकर पोहोचतो; परंतु त्यासाठी जास्त खर्च येतो. समुद्रमार्गे आंबा पाठवणे स्वस्त असले तरी तो वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे निर्यातदार हवाई पर्याय स्वीकारत आहेत. समुद्रमार्गे आंबा पाठवल्यास त्याला किमान चार दिवस लागतात. 

निर्यातदारांमध्ये आनंदाचे वातावरण 
अखाती देशांबरोबर लंडन आणि युरोपलाही निर्यात सुरू झाल्यामुळे निर्यातदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती मोहन डोंगरे यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी युरोपने हापूस आंब्याला बंदी घातली होती. ती गेल्या वर्षी उठवली; परंतु त्या वेळी आंब्यांचा हंगाम संपत आला होता. त्यामुळे त्या वेळी हापूस युरोपला जाऊ शकला नव्हता. आंब्यात रसायन आणि कीटकांचे प्रमाण वाढले असल्याचे कारण देत युरोपने आंब्यावर बंदी घातली होती. त्यामुळे 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे आता युरोपमधील निर्यातीमुळे आंबा बागायतदार आणि निर्यातदार यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. 

Web Title: hapus mango