हापूसची आवक वाढली भाव घसरले; मागणीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

तुर्भे  - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात दोन दिवसांपासून "हापूस'ची आवक वाढली आहे. त्यामुळे महागलेला आंबा काहीसा सामान्यांच्या आवाक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी आठशे ते अठराशे रुपयांना विकली जात होती. दोन दिवसांपासून आवक वाढल्याने भावही काहीसा घसरला आहे. आता एका पेटीला सहाशे ते पंधराशे रुपये भाव आहे. 

कोकणातील हापूस आंब्यासह कर्नाटकच्या हापूसचीही आवक वाढली आहे. गुजरातचा वलसाड हापूसही बाजारात दाखल झाला आहे. 

राज्यातील विविध भागांतून बुधवारी हापूसच्या 74 हजार 876 पेट्या दाखल झाल्या. इतर राज्यांतून 38 हजार 976 पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्याने दरही कमी आहेत. आणखी आठवडाभर आवक स्थिर राहणार असल्याने भाव कमी होतील, अशी शक्‍यता व्यापारी भरत देवकर यांनी व्यक्त केली. 

अवकाळी पावासामुळे हापूस खराब झाला. त्याचा फटका विक्रीला बसला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कच्च्या आंब्याच्या भावात प्रतिपेटीमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी घट झाली. चार ते सहा डझनांच्या पेटीला हजार ते पंधराशे रुपये, सहा ते आठ डझनाच्या पेटीला पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळाला. 

आंब्याचे भाव (प्रतिकिलो/ रुपयांत) 
- लालबाग - 20 ते 40 
- बदाम - 25 ते 40 
- नाटी - 20 ते 30 
- मल्लिका - 30 ते 40 
- पायरी - 25 ते 40 रुपये 

Web Title: Hapus mango price less