
उत्तर कोरियावर राज्य करणारा किम जोंग उन त्याच्या हुकूमशाही आणि हिंसक वर्तनासाठी ओळखला जातो.
North Korea : नवीन वर्षात हुकूमशहा Kim Jong Un सुधारणार?
जगभरात क्रूर हुकूमशहाची प्रतिमा असलेला उत्तर कोरियाचा (North Korea) शासक किम जोंग उन (Kim Jong Un) याचं मन परिवर्तन झालंय का? नवीन वर्षात किम जोंग उनची प्रतिमा बदलणार का? हे प्रश्न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण, गेल्या वर्षभरानंतर किम जोंग उननं नवीन वर्षासाठी जी उद्दिष्टं ठेवली आहेत, ती यापूर्वी कधीही दिसली नाहीत. 2021 च्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात या हुकूमशहानं अण्वस्त्रांऐवजी अन्नधान्याबद्दल बोललंय. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
10 वर्षांपासून उत्तर कोरियावर राज्य करणारा किम जोंग उन त्याच्या हुकूमशाही आणि हिंसक वर्तनासाठी ओळखला जातो. मात्र, नवीन वर्षात किम जोंग उननं स्वत:ला बदलण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उननं आपल्या भाषणादरम्यान घातक शस्त्रं आणि अमेरिकेबद्दल बोलण्याऐवजी ट्रॅक्टर कारखाने, शालेय गणवेश आणि अन्नधान्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केलीय. काल वर्षाच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवार) आपल्या भाषणात हुकूमशहा म्हणाला, उत्तर कोरियाचे 2022 वर्षाचे मुख्य लक्ष्य आर्थिक विकास आणि लोकांचं जीवन सुधारणं असेल. वर्क्स पार्टी ऑफ कोरियाच्या (Works Party of Korea) 8 व्या केंद्रीय समितीच्या बैठकीत किम जोंग उन यानं ही माहिती दिलीय.
हेही वाचा: बॉम्बस्फोटानं पाकिस्तान पुन्हा हादरलं; स्फोटात चार जणांचा मृत्यू
2011 मध्ये वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन उत्तर कोरियाच्या गादीवर बसला. या बैठकीत किम जोंग उनच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखाही बैठकीत मांडण्यात आला. किम जोंग उननं आपल्या भाषणात पूर्वीच्या गोष्टींचा पुनरुच्चार केलाय, ज्यात महत्त्वाच्या धोरणाबाबत बोललं गेलंय. याशिवाय दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत (America) राजनैतिक संबंध वाढवण्याची चर्चा आहे. मात्र, उत्तर कोरियाच्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या भाषणाच्या सारांशात अमेरिकेचा उल्लेख नाही. यामध्ये कोरियाच्या अंतर्गत आणि परराष्ट्र संबंधांवरच चर्चा करण्यात आलीय.
हेही वाचा: 007.. नाम तो सुना होगा! उदयनराजेंच्या ताफ्यात किती गाड्या आहेत माहितीय?
Web Title: North Korea Leader Kim Jong Un Mention Food Tractor Factories And School Uniforms Than Nuclear In His Speech For Year 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..