हार्बर रेल्वे विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई  - सीवूड-दारावे आणि बेलापूर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर एका व्यक्तीने अतिरिक्त वायर फेकल्यामुळे सोमवारी संध्याकाळी हार्बर मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक काही वेळ बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. 

सायंकाळी 7.15च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. वाहतूक सुरू झाल्यानंतरही सुमारे अर्धा तास लोकलसेवा उशिराने धावत होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर अतिरिक्त वायर टाकली असेल किंवा पडली असण्याची शक्‍यता आहे. ही बाब समजताच आमच्या कर्मचाऱ्यांनी ती वायर काढून वाहतूक पूर्ववत केली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. 

रुळावर झाड कोसळले 
पश्‍चिम रेल्वे मार्गावरील विलेपार्ले ते अंधेरी स्थानकांदरम्यान सोमवारी सायंकाळी रुळावर एक झाड कोसळले. त्यामुळे चर्चगेटवरून बोरिवलीला जाणारी 7.48 वाजताची लोकल काही वेळ विलेपार्ले ते अंधेरीदरम्यान थांबवण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Harbor rail line disrupted