
मुंबईत हार्बर लाइनची लोकलसेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक अडचणींमुळे हार्बर मार्गावरील लोकल बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलीय. तासाभराहून अधिक काळ लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून असल्यानं कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. हार्बरची लोकलसेवा ठप्प झाल्यानंतर ट्रान्स हार्बरची सेवाही विस्कळीत झाली आहे. काही प्रवाशी लोकलमधून उतरून चालत निघाल्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.