
सेंट्रल व हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा
मुंबईतलं दळणवळणाचं प्रमुख माध्यम असलेली लोकल ट्रेन सध्या खोळंबली आहे. त्यामुळे मुंबईतल्या वेगावर चाप बसला आहे. यंत्रणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा खोळंबा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाकडे जाणाऱ्या, तसंच सेंट्रल आणि हार्बर लाईनवर प्रवास करणाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याविषयीची माहिती दिली आहे. वाशी स्थानकावर सिग्नलिंग यंत्रणेत झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे पहाटे पाच वाजल्यापासून वाहतुकीवर पहिणार झाला आहे. मानखुर्द आणि पनवेल मार्गे डाऊन हार्बर गाड्या धावत नाहीत. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी दरम्यानच्या गाड्या धावत नाहीत.
कोणत्या गाड्या सुरू आहेत?
सध्या डाऊन हार्बर लाईनवरील गाड्या सकाळी ६.२५ पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत.
अप आणि डाऊन हार्बर लाईन गाड्या सुरू आहेत.
ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि नेरुळ/पनवेल - ठाणे गाड्या सुरू आहेत.
ट्रान्सहार्बर मार्गावरीलच ठाणे -वाशी-ठाणे गाड्याही सकाळी ६.४५ पासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत.