

14 railway stations Transferred to Central Railway
ESakal
तुर्भे : सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभालीअभावी दुरवस्था झाल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती. खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.