

Harbour Line AC Local
ESakal
मुंबई : मुंबईकरांची लाइफलाइन मानली जाणाऱ्या लोकसेवेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दररोज लाखो प्रवासी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करतात. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी तसेच आरामदायी प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या जात आहेत. अधिक लोकल ट्रेन संख्या, १५ लोकल कोच असलेल्या गाड्यांसह प्रवाशांचा प्रवास गारेगार होण्यासाठी एसी लोकलही सुरु करण्यात आल्या आहेत.