

Harbour Railway Line Disruption
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेवर ठाणे-मुलुंडदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. यामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर आता सकाळ होताच हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.