हार्दिकने नताशाला केलं प्रपोज, असं आलं उत्तर..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

फॉरएव्हर येस म्हणत तिने केला व्हिडीओ पोस्ट  

बादशाहचं 'डीजे वाले बाबू मधील अभिनेत्री आणि डान्सर नताशा स्टानोविकला क्रिकेटर हार्दिक पांड्या ने अखेर प्रपोज केलंय. नताशा हि मुळची सर्बियामधील आहे. अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करतायत.  

हार्दिक आणि नताशाला अनेक वेळा एकत्र स्पॉट केलं गेलंय. या आधी हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र म्हणून सांगायचे. मात्र आता हार्दिकने आणि नताशाने आपापल्या इन्स्टाग्राम प्रोफाईल वरून प्रपोज करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याने आता त्यांच्या अफेअरवर शिकामोर्तब झालाय. 

मोठी बातमी : शिवसेनेत नाराजीचा स्फोट..

नताशा 2012 मध्ये बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावायला सर्बिया मधून मुंबईत आली.  नताशाने भारतात एक मॉडेल म्हणून अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलंय. नताशाने तिच्या करिअरची सुरवातच मॉडेल म्हणूनच केलीये. नताशाने जॉन्सन एंड जॉन्सन सोबत काम केलंय.     

2013 मध्ये प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमामध्ये नताशाने एक अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. नताशाने या सिनेमात अजय देवगण सोबत एक आइटम सॉंग केलंय. अनेक विदेशी अभिनेत्र्यांप्रमाणे नताशा देखील बिग बॉस मधील स्पर्धक राहिली आहे.  बिग बॉस हिंदीच्या सिझन 8 मध्ये नताशा 28 दिवस बिग बॉसच्या घरात राहिलीये 

नताशाला आपण रॅपर बादशाह च्या 'डीजे वाले बाबू' या गाण्यात काम करताना पाहिलंय. याचसोबत नताशाने रणवीर सिंग सोबत ड्यूरेक्सच्या जाहिरातीमध्ये देखील काम केलंय. नताशाने फुकरे रिटर्न्स आणि झीरो या सिनेमांमध्ये देखील काम केलंय. 

आतील खबर : ममता दीदींना टक्कर देण्यासाठी अमित शाह यानी उचललं 'हे' पाऊल.. 

नताशा फक्त मॉडेलच नाही तर एक उत्तम नर्तिका देखील देखील आहे. नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून डान्स करणं सुरु केलं होतं.  नताशाने मॉडर्न बॅले डान्स स्कूलमध्ये तब्बल सतरा वर्ष डान्सचं प्रशिक्षण घेतलंय. 2010 मध्ये नताशाला मिस स्पोर्ट्स ऑफ सर्बिया हा खिताब मिळाला होता.   

हार्दिक पांड्या सोबत रिलेशनमध्ये येण्या आधी नताशाचं अभिनेता अली गोनी सोबत रिलेशनमध्ये होती. ब्रेकअपनंतर नताशा आणि अली यांना नच बलिये सिझन 9 मध्ये एकत्रित पाहण्यात आलं होतं.  

फक्त आलीच नाही तर अर्जुन रामपाल सोबत देखील नताशाचं नाव जोडलं जायचं. अर्जुनच्या डॅडी या सिनेमात देखील नताशाने एक आयटम सॉंग केलंय. हार्दिक पांड्याने नताशा आणि त्याच्या घरच्यांची देखील भेट घडवून दिली आहे, त्यांना देखील नताशा आवडलीये 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Forever yes @hardikpandya93

 

मोठी बातमी :  दिल्लीतील मातोश्रींच सेनेला ऐकावं लागतं - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

हार्दिक पांड्या याचं देखील नाव अनेक अभिनेत्र्यांसोबत जोडलं गेलंय.  यामध्ये उर्वशी रौतेला, मॉडेल लीशा शर्मा यांच्यासोबत हार्दिक पांड्याचं अफेअर होतं.  परिणीति चोपडा, शिबानी दांडेकर, ईशा गुप्ता यांच्यासोबत हार्दिकचं नाव जोडलं गेलंय

WebTitle : hardik pandya proposes natasha she replied with forever yes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hardik pandya proposes natasha she replied with forever yes