आतील खबर : ममता दीदींना टक्कर देण्यासाठी अमित शाह यांनी उचललं 'हे' पाऊल

आतील खबर : ममता दीदींना टक्कर देण्यासाठी अमित शाह यांनी उचललं 'हे' पाऊल

पश्चिम बंगाल. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचं राज्य. पश्चिम बंगाल मधील विधानसभा  निवडणुकांना फक्त एक वर्ष बाकी आहे. अशातच भाजपचे अध्यक्ष अमित शाह निवडणुकीच्या तयारीला लागलेत.  निवडणुकीची रणनीती आखताना कोणतीही चूक होऊ नये किंवा त्रुटी राहू नये  म्हणून अमित शाह काळजी घेताना पाहायला मिळतायत. म्हणूनच भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह हे आता बंगाली भाषा शिकतायत.  

पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आता एक वर्ष बाकी आहे. अशात आता  भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बंगाली शिकायला सुरवात केली आहे. आपला प्रचार कुठेही कमी पडू नये म्हणून अमित शाह यांनी बंगाली भाषा शिकायचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. IANS या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अमित शाह यानी बंगाली शिकण्यासाठी एका शिक्षकाची देखील नेमणूक केली आहे. यामागील उद्देश अमित शाह यांना बंगाली भाषा समजणं आणि आपल्या भाषणांची सुरवात बंगाली भाषेत प्रभावी पाणे करणं अशी आहे. 

अमित शाह यांना निवडणुकांसाठीची रणनीती आखण्यासाठी ओळखलं जातं. त्यांना भाजपचे चाणक्य देखील संबोधलं जातं. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत कुठे काही कमी पडू नये म्हणून तयारीला लागलेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये अमित शाह यांनी सर्व सूत्र स्वतःच्या हातात ठेवली आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आणि समन्वय अत्यंत  महत्त्वाचा असतो. म्हणूनच निवडणुकीच्या रणधुमाळीत रणनीतीचा भाग म्हणून अमित शाह बंगाली शिकतायत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी 'मां, माटी और मानुष'चा नारा बुलंद केलाय. गेल्या काही काळात त्यांनी बंगाली अस्मितेच्या मुद्द्याचं कार्ड खेलेलेलं पाहायला मिळालं. ममता दिदींनी कायम अमित शाह यांना परप्रांतीय म्हणून पण संबोधलंय.    

पश्चिम बंगालमधील एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार अमित शाह यांचं बंगाली शिकणं काही नवीन नाही. अमित शाह हे बंगाली याचसोबत तमिळ आणि देशातील आणखी चार भाषा शिकतायत. असं बोललं जातं की अमित शाह जेव्हा जेलमध्ये होते, तेंव्हा त्यांना दोन वर्ष गुजरातमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. तेंव्हा त्यांनी हिंदीचे धडे गिरवले आणि म्हणूनच एवढे वर्ष गुजरातमध्ये राहून सुद्धा अमित शाह यांना उत्तम हिंदी बोलता येतं.

भाजप अध्यक्ष होण्याआधी अमित शाह यांनी देशभराचा दौरा केला. यामध्ये त्यांनी अनेक तीर्थस्थळांना भेट दिली. या भेटींच्या माध्यमातून त्यांना सामाजिक आणि धार्मिक गोष्टींचे बारकावे समजण्यास मदत झाली. असं मानलं जातं अमित शाह यांच्या रिसर्चचा फायदा त्यांना उत्तर प्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये राबवण्यात आलेल्या निवडणूक रणनीतीत झाला.  

याचसोबत अमित शाह यांनी शास्त्रीय संगीताचे देखील धडे घेतलेत. स्वतःला ताण-तणावापासून दूर ठेवण्यासाठी अमित शाह शास्त्रीय संगीताचा  आधार घेतात. 

Webtitle : BJP president amit shah taking lessons of Bengali language

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com