दारासमोर दिवे, खिडकीत आकर्षक कंदील आणि रोषणाई; मात्र यंदा मुंबईकरांची दिवाळी पहाट शांततेत

सुमित बागुल
Saturday, 14 November 2020

दरवर्षी दिवाळी पहाटेला मुंबई ठाणेकर अभ्यंगस्नान केल्यानंतर देवळांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लावत असतात

मुंबई : २०२० मधील बाकीचे सण जसे वेगळे ठरलेत तशीच यंदाची दिवाळी देखील जरा वेगळी आहे. अर्थात याला कारण आहे ते म्हणजे कोरोनाचे. कोरोनामुळे आपण मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ शकत नाही, ज्या प्रकारे एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा आणि फराळाची देवाण घेवाण व्हायची तशी यंदा होत नाहीये. मात्र मुंबईकरांनी यंदाच्या दिवाळीच्या पहाटे एक उत्तम उदाहरण घालून दिलंय असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कारण यंदा दिवाळी पहाटेला मुंबईत फटाक्यांचा आवाज घुमलेला नाही. प्रशासनाकडून फटाक्यांवर बंधने आणली गेलीत. मात्र मुंबई ठाणेकरांनी सामाजिक भान जपून आपली दिवाळी पाहाट साजरी केली आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबईत एन-95 मास्कचा तुटवडा? किमतीवरील नियंत्रणामुळे कंपन्यांचा निर्मितीस नकार

दरवर्षी दिवाळी पहाटेला मुंबई ठाणेकर अभ्यंगस्नान केल्यानंतर देवळांमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लावत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यातील मंदिरे अद्याप खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिराबाहेर यंदा शुकशुकाट पाहायला मिळतोय. अतिशय कमी प्रमाणात नागरिक सकाळी घराबाहेर पडलेत आणि महत्त्वाच्या मंदिराबाहेर बाहेरून नमस्कार करताना आढळून आलेत.

महत्त्वाची बातमी : विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंच्या खांद्यावर पक्षाने टाकली मोठी जबाबदारी

मुंबई, ठाण्यात दिवाळी पहाटेचा कार्यक्रम मोठ्या जोशात साजरा केला जातो. मुंबईतील अनेक रस्त्यांवर तरुणाई एकवटलेली पाहायला मिळते. तेही चित्र यंदा पाहायला मिळालेलं नाही. सोबतच दिवाळीची पहाट आणि फटाक्यांच्या आतिषबाजी हे देखील नेहमीचंच समीकरण. मात्र पहिल्यांदाच मुंबईत दिवाळी पहाटे एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना रुग्णांना त्रास होऊ शकतो म्हणून यंदा फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अशात, सामाजिक भान जपत मुंबई ठाणेकरांनी आपली दिवाळी पहाट फटाके न फोडता साजरी केली आहे. मुंबईकरांनी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचं चित्र आज दिसतं आहे.

hardly fews firecrackers busted on diwali amid corona pandemic in mumbai

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hardly fews firecrackers busted on diwali amid corona pandemic in mumbai