मुंबईतल्या पावसाचं भयाण वास्तव : घर पडलं नाल्यात, दिड वर्षाच्या मुलीसह महिलेचा मृत्यू

मुंबईतल्या पावसाचं भयाण वास्तव : घर पडलं नाल्यात, दिड वर्षाच्या मुलीसह महिलेचा मृत्यू

मुंबई : सोमवार रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने आज निम्म्या मुंबईची झोप उडवली. शहराच्या अनेक भागातील घरांमध्ये मध्यरात्रीनंतर पाणी शिरण्यास सुरवात झाली. तर, चेंबूर येथील वाशी नाकामध्ये घरावर झाड पडून दोन मुलं जखमी झाली. सांताक्रुझ येथे सकाळी 11 वाजल्याच्या सुमार घराची भिंत नाल्यात ढासळून एका दिड वर्षाच्या मुलीसह दोघींचा मृत्यू झाला आहे. तर, एकीचा शोध सुरु आहे. मिठी नदी आणि दहिसर नदी सकाळपर्यंत धोक्‍याच्या पातळीवर पोहचली होती.सांताक्रूझ येथे नाल्यात पडलेल्या मुलीचा शोध रात्री थांबविण्यात आला आहे. श्रेया काकडे ही 5 वर्षाची मुलगी बेपत्ता आहे.

कांदिवली समता नगर येथे पश्‍चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. यात एका वाहानाचे किरकोळ नुकसान झाले. त्यामुळे वाहतुक वळवण्यात आली. कुलाबा येथे सोमवार रात्री 8.30 ते मंगळवार सकाळ 8.30 वाजे पर्यंत 230.4 आणि सांताक्रुझ येथे 235.6 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे. दुपार पासून पावसाचा जोर ओसरल्याने मुंबईला दिलासा मिळाला.

रात्रीपासून सुुरु असलेल्या पावसामुळे आज सकाळीच मुंबईची रेल्वे वाहतुक ठप्प पडली होती. त्याचा फटका अत्यावश्‍यक सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसह कोविड सेवेतील वैद्यकिय कर्मचाऱ्यांन बसला. रेल्वे बंद असतानाच रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतुक ठप्प पडली होती.पहाटे पुर्वी चेंबूर येथील वाशी नाका परीरातील एचपी कॉलनी येथे एका घरावर झाड पडून अदनान शेख 5 वर्ष आणि इम्रान शेख 13 वर्ष हि दोन मुलं जखमी झाली. त्यांच्यावर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सांताक्रुझ येथील आग्रीपाडा परीसरात एका नाल्याला लागून असलेले घर संरक्षक भिंत खचल्याने नाल्यात पडले. यात घरातील चार जणी नाल्यात पडल्या.दिड वर्षाच्या जान्हवी काकडे आणि रेखा काकडे 26 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर 3 वर्षाच्या शिवन्या काकडे या मुलीवर रुग्णालयात उपचार सुुर आहे. अजून एक मुलगी नाल्यात ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्‍यता आहे. तीचा राष्ट्रीय आपत्नी निवावरण बल आणि अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहेत. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच हे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्‍यता असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत.

मिठी आणि दहिसर नदी सकाळी धोक्‍याच्या पातळी जवळ पोहचली होती. त्यामुळे नदीच्या पुलावरील वाहतुक काही काळ बंद करण्यात आली होती. तर, कुर्ला येथे मिठी नदीला लागून असलेल्या क्रांतीनगर मधील नागरीकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच, त्यांना सुरक्षीतस्थळी हलविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून दोन कुटूंबांना स्थालांतरीत करण्यता आले.

पालकमंत्री, महापौर, आयुक्त रस्त्यावर
मुंबईत उदभवलेल्या पुरपरीस्थीतीचा आढावा घेण्यासाठी उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे,महापौर किशोरी पेडणेकर तसेच पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल स्वत: रस्त्यावर उतरले होते.विविध ठिकाणी फिरुन त्यांनी पुरपरीस्थीतीचा आढावा घेतला.

महामुंबईत रेड अलर्ट कायम
ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील काही भागात 200 मि.मी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वेध शाळेने वर्तवला आहे. तर, मुंबई आणि रायगड मध्ये उद्या रेड अलर्ट असून काही भागात 200 मि.मी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

( संकलन - सुमित बागुल )

harsh reality of mumbai rains house collapsed in nala child and a woman lost life

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com